सोलापूर शहर पोलीस दलातील महिला पोलिसाची आत्महत्या


सोलापूर/प्रतिनिधी:

शहर पोलीस दलातील महिला पोलीस अमृता रमेश पांगरे (वय ३८ वर्ष, रा.  बाळे, सोलापूर) यांनी विष प्राशन करून आज बुधवारी दुपारी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

आज सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील हगलूर बसस्थानकाजवळ अमृता या बेशुध्द अवस्थेत मिळून आल्या होत्या. त्यांना नातेवाईकांनी तातडीने उपचारास दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्या मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले

Post a Comment

0 Comments