प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी:
जयसिंगपूर कॉलेजमध्ये PIINACOLODA HOLLYDAYS LLP' या आंतरराष्ट्रीय खासगी कंपनी तर्फे पर्यटन क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान एम.ए. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी व आयोजित करण्यात आले होते. यासाठी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली.
जयसिंगपूर कॉलेज व सदर कंपनी मध्ये झालेल्या सामंजस्य करारान्वये हा व्याख्यानरुपी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कंपनीच्या गुणवत्तापूर्ण विस्तारीकरण व विकासासाठी कुशल मनुष्यबळाच्या शोधात असल्यामुळे सदर कंपनीने जयसिंगपूर कॉलेज मध्ये कॉलेजमधील पर्यटन क्षेत्रात करिअर करु पाहणाऱ्या अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यासाठी ही एक नामी सुवर्णसंधी या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली होती. या क्षेत्रात आवड व करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध होईल या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले होते
PIINACOLODA HOLLYDAYS LLP' या कंपनी मधील ऑफिस एक्झिक्यूटिव्ह कीर्ती कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे मनस्वी स्वागत करून या कंपनीतर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आपला हेतू स्पष्ट केला त्या म्हणाले की, विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा कोणत्या आहेत या माहिती अभावी ते आपल्याला आवश्यक असणाऱ्या क्षेत्रात करिअर करू शकत नाही परंतु आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हौसी विद्यार्थ्यांना या माध्यमातून करिअर म्हणून विचार करण्याची एक संधी व पर्याय देण्याची व्यवस्था केली आहे.
यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व साधन व्यक्ती म्हणून कंपनीच्या प्रशिक्षिका व मार्केटिंग मॅनेजर एकता शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या विषयाअंतर्गत त्यांनी पर्यटनाची व्याप्ती, पर्यटनाची ठळक वैशिष्ट्ये, पर्यटनाचे प्रकार, पर्यटनाची गरज, पर्यटनाचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान, पर्टनाकडे वाढत चाललेल्या लोकांचा कल, जैवविविधता, मनोरंजनासाठी पर्यटन,धार्मिक, भौगोलिक व सांस्कृतिक पर्यटक्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधी इत्यादी गोष्टी विस्तृतपणे समजावून सांगितल्या. पर्यटक्षेत्रात करिअर करु पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना PIINACOLODA HOLLYDAYS LLP'आगामी काळात आयोजित केल्या जाणार्या आगामी प्रशिक्षण शिबीरांविषयी कि सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सांगोपांग प्रश्नांची अत्यंत उत्तम पद्धतीने शंकानिरसन केले.तसेच पर्यटक्षेत्रात करिअर करु पाहणारे विद्यार्थी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेऊन' PIINACOLODA HOLLYDAYS LLP' या कंपनीत रोजगार प्राप्त करु शकतात अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उत्तम सुत्रसंचालन एम.ए.भाग-२ ची विद्यार्थी प्रतिनिधी यास्मिन मुल्ला हिने केले. तर या कार्यक्रमाचे आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी मानले. या कार्यक्रमास या कंपनीचे स्टाफ श्रध्दा माळी,प्रसाद काशिद,पोर्णिमा निकम व पूजा वांगीकर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.तसेच या कार्यक्रमास अर्थशास्त्र विभागाचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
या व्याख्यान विषयाच्या अनुषंगाने बहुसंख्य विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे निश्चित केले आहे. तसेच विद्यार्थीवर्गा कडून अशा प्रकारच्या कंपन्या कॉलेज मध्ये येऊन त्यांना भविष्यातील रोजगारात विषयी मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या सोई देत असल्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त होत आहे. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच विद्यार्थीवर्गा कडून विविध क्षेत्रात काम करित असलेल्या अनेक कंपन्यांना कॉलेज प्रशासनाने कॉलेज मध्ये आणून विविध प्रकारच्या प्रशिक्षणाच्या सोई व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments