मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं एकच खळबळ

 
धनंजय मुंडे यांच्यासह संजय राठोड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत, संजय राठोड यांना तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. महाराष्ट्रातील या प्रकरणाच्या पुढे जात आता कर्नाटकाच्या राजकारण अत्यंत खळबळजनक प्रकार सुरु असल्याचं समोर आलं आहे.

बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटकच्या भाजप सरकारमधील जलसंधारण मंत्री रमेश जारकीहोळी यांचे अत्यंत आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले आहेत. या व्हिडीओंमुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप केला जात आहे.
(Advertise)

जारकीहोळी यांनी नोकरीचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप कलहळ्ळी यांनी केला आहे. बंगळुरुच्या पोलीस आयुक्तांकडे त्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली असून पीडित तरुणीच्या जीवाला धोका असल्याचं सांगत तिला सुरक्षाव्यवस्था पुरवण्याची मागणी देखील केली आहे. या प्रकरणात पीडित तरुणीला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे.

कर्नाटक सरकारमधील बड्या मंत्र्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ माजली आहे. मंत्र्याने पीडित तरुणीवर नोकरीचं अमिष दाखवून अत्याचार केले, मात्र नोकरी दिली नाही. त्यामुळे संबंधित तरुणीने काही क्षण रेकॉर्ड केले, मंत्र्याला ही बाब समजताच त्याने तरुणीला धमकी दिली, अशी माहिती देखील मिळत आहे. दरम्यान, व्हायरल होत असलेले व्हिडीओ महिन्याभरापूर्वीचे असल्याची माहिती आहे.

Post a Comment

0 Comments