श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचा १५ कोटींचा जीएसटी थकीत, जीएसटी विभागाकडून कारखान्याचे सर्व बँक खाते सील


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी कारखान्याची सेवा व जीएसटी कर विभागाकडून साखरावरील याप्रकरणी सर्वच्या सर्व बँक खाते सील करण्याचे आदेश दिले आहे. जीएसटीची सुमारे १५  कोटीची रक्कम थकल्या प्रकरणी सह आयुक्त कार्यालयाने विठ्ठल कारखान्याची सर्वच सर्व बँक खाती सील केले आहे. यामुळे कर्जबाजारी असलेल्या विठ्ठल कारखान्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

विठ्ठल कारखान्याची आर्थिक परिस्थिती बिकट

गेल्या अनेक दिवसापासून आर्थिक परिस्थितीमुळे श्री विठ्ठल सहकारी कारखाना डबघाईला आला होता. त्यामुळे सुमारे दोन वर्ष कारखाना बंद अवस्थेत होता. मात्र राज्य सरकारच्या मदतीमुळे चालू हंगामात कारखाना सुरू करण्यात आला मात्र कारखान्यावरील संकट सुरूच आहे. चालू हंगामात कारखान्यांकडून साखर विक्री होऊनही जीएसटी व सेवा कराची रक्कम भरलीच नाही. त्याबाबत जीएसटी विभागाकडून कारखान्याला नोटीसही बजावण्यात आली होती मात्र कोणत्याही प्रकारचा जीएसटी न भरल्यामुळे कारखान्यातील व्यवहार असणारे सर्व बँकेचे खाते सील करण्याचे आदेश दिले आहे.

१५ कोटी रुपये जीएसटी थकीत ..

श्री विठ्ठल सहकारी कारखान्यावर करोडो रुपयांचे कर्ज थकीत आहे त्यातच चालू हंगामामध्ये कारखान्यांनी साखरा वरील १५ कोटी रुपयांचा जीएसटी कर पृथ्वीला आहे त्यामुळे कारखान्याचे सोलापूर जनता सहकारी बँकेसह सर्व बँकेतील व्यवहार तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच कारखान्यातील चालू गळीत हंगामातील  गाळप झालेल्या ऊसाची, वाहतूक, कामगार व इतर आशी जवळपास ७० कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. या मुद्द्यावरून ऊस कारखाने विद्यमान संचालक युवराज पाटील यांनी राज्य सहकार आयुक्तांना पत्र लिहिले आहे

Post a Comment

0 Comments