कमांडो अकॅडमी परंडा! बैलासारख्या राबणाऱ्या बापाच्या कष्टाची जाण ठेवा: डॉ. प्रा. मारुती लोंढे


परंडा/प्रतिनिधी:

शेतामध्ये आपले वडील अहोरात्र बैलाप्रमाणे काम करत असतात त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून  विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा व स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होऊन आई-वडिलांच्या कष्टाची उतराई करावी. असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्रा. मारुती लोंढे यांनी कमांडो अकॅडमी च्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत केले. 

 ते पुढे म्हणाले की, आपण कोणत्या जाती मध्ये जन्माला येतो,कोणत्या गावांमध्ये जन्माला येतो,याला काहीही अर्थ उरत नाही तर आपण अभ्यास किती प्रामाणिकपणे करतो यावर आपले यश अवलंबून असते. सर्वप्रथम प्रश्नपत्रिका घेऊन त्यांचे विश्लेषण करणे गरजेचे असते तरच अशा स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षा आपण यशस्वीपणे  उत्तीर्ण होऊ शकतो. गुणवत्ता कुठेही उगवते  माळरानावर उगवते जिथे तपस्या सुरू असते तेथे गुणवत्तेला जन्म घ्यावाच लागतो असे प्रतिपादन प्रा. लोंढे यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परिक्षेतील टक्का वाढत आहे. असेही ते सांगायला विसरले असेही ते सांगायला विसरले नाहीत. स्पर्धा परीक्षा करत असताना मात्र नेहमी संयम बाळगणे अत्यावश्यक आहे. संयम हेच यशाचे गमक आहे. जी व्यक्ती संयम नावाचे शस्त्र चालवते ती व्यक्ती जीवनाच्या युध्द भूमीवर कायम अजिंक्य असते.

आई वडिलांच्या कष्टाची महती समजावून सांगण्यासाठी त्यांनी कवितांचे सादरीकरण केले व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. मुलींना मार्गदर्शन करत असताना  सत्याची लाली,  प्रार्थनेचा हार, करुणाचे काजळ आणि दातृत्वाचा बांगड्या  अशा स्वरूपाचा  शृंगार  असणे गरजेचे असते असे ते म्हणाले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमांडो अकॅडमी चे संचालक मेजर महावीर तनपुरे होते तर प्रमुख उपस्थिती माननीय लक्ष्‍मण मोरे हे होते. हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून माक्सचा वापर करून घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments