तरुण वर्गात प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते रावण या पुस्तकाचे लेखक शरद तांदळे यांनी आपल्या एका भाषणात वारकरी संप्रदाय, हरिपाठ आणि संप्रदाय परंपरे बाबत अवमान जनक वक्तव्य केले आहे. सी. सी. टी. व्ही या फेसबुक पेज ने याचा निषेध नोंदवत हा व्हिडीओ शेर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेक सामान्य याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
तांदळे यांच्या भाषणात, वारकरी संप्रदायाच्या कीर्तन आणि प्रवचन परंपरे बाबत अवमानजनक वक्तव्य करण्यात आले आहे. तांदळे म्हणाले, पाच पंचवीस लोक पाय पडले की अख्खा गाव पाया पडतो. हरिपाठताला एक डायलॉग पाठ करायचा, हा धंदा सोपा आहे. आळंदीत महाराज बवण्याच्या इन्स्टिट्यूट सुरू आहे. ८०% समाज बावळट असल्याने हा धंदा सोपा आहे.
शरद तांदळे यांच्या या वक्तव्यावर रोष व्यक्त केला जात आहे. एका प्रसिद्ध लेखकाने अशी वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. तांदळे यांनी तातडीने माफी मागण्याची मागणी आता समाज माध्यमातून होत आहे. याबाबत शरद तांदळे यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
कुंडलिक महाराज धामणगावकर प्रतिक्रिया-
शरद तांदळेसारख्या अज्ञानी माणसामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक हानी होत असून सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत,आहे. त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाची जी बदनामी झालेली आहे, त्याबद्दल त्यांनी समस्त वारकरी संप्रदायाची व सर्व वारकरी शिक्षण संस्था यांची जाहीर माफी मागावी अन्यथा वारकऱ्यांच्या तीव्र रोषास पात्र राहावे लागेल. किर्तन परंपरा ही मुळातच समाज प्रबोधनासाठी उदयास आलेली आहे."नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप लावू जगी|" या संत नामदेवाच्या अभंगाप्रमाणे आळंदीतील सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अतिशय निरपेक्ष वृत्तीने विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही या तत्त्वावर गेली शंभर वर्ष चालत असून देशाभिमानी, चारित्र्यवान, वैराग्यशील ,त्यागी अभ्यासू विध्यार्थी घडवत आहे. अशा या संस्थेमुळे आणि इतर वारकरी शिक्षण संस्थामुळे राष्ट्र उभारणीच पवित्र कार्य मोठ्या प्रमाणात होत आहे, आणि अशा संस्थेबद्दल, कीर्तनकाराबद्दल आणि वारकरी संप्रदायाबद्दल असं चुकीचं विधान करणं लोक हसवण्यासाठी एका महत्वपूर्ण समाज उन्नती करणाऱ्या परंपरेविषयी किंबहुना तिच्याशिवाय महाराष्ट्र या राज्याला अर्थच उरत नाही ती वारकरी पवित्र धारा .त्या सात्त्विक धारेविषयी केवळ लोकांची करमणूक व्हावी म्हणून काहीतरी विधानं करणं हे कोणत्याही सज्जन माणसाचं लक्षण नाही.
अशा या महान सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्य करणार्या शिक्षण संस्थेविषयी तांदळेसारख्या अज्ञानी इसमाने जे बेताल वक्तव्य केलं त्या बेताल वक्तव्याचा एक वारकरी म्हणून मी जाहीर निषेध करीत आहे. तांदळे यांनी वारकरी संप्रदाय उद्गम आणि विकास, वारकरी संप्रदायाचे सामाजिक कार्य,परंपरा याबद्दल अधिक माहिती घ्यावी आणि ती नामांकित लेखकांचे संदर्भग्रंथ वाचून घ्यावी अशी त्यांना सूचना मी करतो.आपण जे चुकीचं बोललात त्याच जर तुम्ही स्वतः आत्मचिंतन केलात तर तुम्ही माणूस आहात का हा तुम्हालाच प्रश्न पडेल तांदळे महोदय.आपल्याला पांडुरंग परमात्म्याने सद्बुद्धी द्यावी हीच अपेक्षा.रामकृष्णहरी
1 Comments
Hoy kundlik Maharaj mhantyt te yogach aahe
ReplyDelete