बार्शी! चिखर्डेच्या सरपंचपदी प्रकाश पाटील तर उपसरपंच पदी अरुण चौधरी


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील बहुचर्चित अशा चिखर्डे गावांत आमदार राजेंद्र राऊत गटाच्या येडेश्वरी ग्राम विकास आघाडीने ११ पैकी ११ जागा जिंकून दणदणीत यश ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मिळवले होते. सरपंच पदी प्रकाश शिवाजी पाटील तर उपसरपंच पदी अरुण चौधरी यांनी बिनविरोध निवड झाली.  

अत्यंत शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभावाच्या प्रकाश पाटील यांच्या निवडीमुळे गावामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावाच्या विकासासाठी दिलेला शब्द पाळणार त्याचबरोबर स्मार्ट ग्रामची निर्मिती करीत मुलभूत सुविधांची प्राधान्याने पूर्तता करणार असल्याचे सरपंचपदी निवड झाल्यानंतर बोलताना प्रकाश पाटील यांनी सांगितले.
(Advertise)

निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्याचा सत्कार करण्यात आला यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता रामलिंग कोंढारे, संभाजी बापूराव कोंढारे, फुलबाई विलास अपुणे, हिना समीर शेख, सुभाष साहेबराव देवकर, माधुरी सचिन पाचकवडे, जयराम नारायण आडगळे, जनाबाई वसंत यादव, शोभा मोहन मसेकर मोठ्या उत्साहात गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

चिकर्डे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडीवेळी अमित कोंढारे, संजय कोंढारे, नानासाहेब कोंढारे, संदेश नाना देवकर, विजय कोंढरे, प्रमोद सवणे, प्रकाश गजानन कोंढरे, प्रदीप पाचकवडे, गणेश ढवळे, दिंगबर मसेकर, जीवन नाना निंबाळकर, महादेव ढावरे, दिनेश लोंढे, राम ढावरे, सुरेश ढावरे, इकबाल मुलाणी, मोसीन सय्यद,  निशांत मोहिते, चंदू कोंढरे, अशोक आदिनाथ कोंढरे, लक्ष्मण खोत, विक्रम पाटील, डॉक्टर पांडुरंग मसेकर रवींद्र गायकवाड, हमीद शेख, आयुब शेख, बाळासाहेब कोंढारे, बिभिशन पाचकवडे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर फटाके उडवून पेढे वाटत जल्लोष साजरा केला.
 

Post a Comment

0 Comments