पुदुचेरीतील सत्तारूढ काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरून हटवले.
तेलंगणाच्या राज्यपाल टी. सुंदरराजन यांच्याकडे पुदुचेरीची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.नव्या राज्यपालांची नियुक्ती होईपर्यंत सुंदरराजन यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपविल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे माध्यम सचिव अजयकुमार सिंह यांनी एका निवेदनामध्ये म्हटले आहे.
आमदाराचा राजीनामा
काँग्रेसचे आमदार ए. जॉन कुमार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने येत्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का बसला आहे. जॉन कुमार यांनी राजीनामा दिल्याने पुदुचेरी विधानसभेत सत्तारूढ आणि विरोधकांचे संख्याबळ समसमान झाले आहे. विधानसभेत काँग्रेस आघाडीचे आता १४ सदस्य असून विधानसभेची सदस्यसंख्या २८ आहे.
0 Comments