चंदगड येथे आठवणीतील एम डी कार्यक्रम संपन्न...चंदगड येथे आठवणीतील एम डी कार्यक्रम संपन्न
चंदगड तालुका परिवर्तन चळवळीचे आधारस्तंभ कालकथित एम.डी.कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्याचे चंदगड तालुका परिवर्तन चळवळीतील योगदान आणि कार्याचा आढावा घेण्यासाठी चंदगड येथे आठवणीतील एम डी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मनोहर दिवटे यांनी केले.

यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी एम.डी.कांबळे यांच्या बद्दलच्या आठवणी जाग्या करत त्याचे चंदगड तालुका परिवर्तन चळवळीतील योगदान आणि एकूणच त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्यांचे मोठे जावई आणि सेवानिवृत्त सैनिक कॅप्टन तुकाराम कांबळे(सुंडी) हे होते.एम डी कांबळेंच्या आठवणी जाग्या करत ते म्हणाले की,त्यांनी कधीही मुलगा आणि जावई असा भेदभाव केला नाही.सगळ्यासोबत ते अगदी प्रेमाचे आणि आपुलकीने वागत असत.अगदी शांत स्वभावाचे एम.डी त्यामुळेच सर्वांना आपलेसे वाटत.
यावेळी उपस्थित वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणी सांगत त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. एम.डी.कांबळे यांचं पुस्तकांवर अफाट प्रेम.एखाद्या शिक्षकाच्या घरात नसतील एवढी पुस्तकं त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात आहेत.भेट म्हणून पुस्तकं द्यावीत आणि घ्यावीत ही त्यांची संकल्पना होती.पोटाला चिमटा घेऊन पुस्तकं विकत घेणारा हा अवलिया कल्पनेपलिकडचा होता...

यावेळी "आठवणीतील एम डी" या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन त्यांच्या पत्नी निर्मला कांबळे,मुलगा सुनिल कांबळे,जावई आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने,
रवी कांबळे(दाटे),प्रभू कांबळे(बसर्गे),अनंत कांबळे(कोरज),एकनाथ कांबळे(माजी सरपंच,हलकर्णी),सटुप्पा पेडणेकर(न्हावेली),नवनीत पाटील(शिवणगे),राजेंद्र कांबळे(नांदवडे),प्रा.डॉ.दिपक कांबळे(झांबरे),अभिजित कांबळे(अडकूर),श्रीकांत कांबळे,राजू कांबळे(हेरे),पांडूरंग कांबळे(गवसे),रामजी कांबळे,विक्रम कांबळे(दाटे),अंकूश कांबळे(करंजगाव),विनायक खांडेकर(उपसरपंच,हिंडगाव),अमोल कांबळे(सरपंच,दाटे),
तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून एम.डी.कांबळे परिवाराकडून महात्मा फुले विद्यार्थी वसतीगृह,हेरे येथील विद्यार्थ्यांना शालेय  साहित्याचे वाटप चंदगड महाविद्यालयाचे प्राध्यापक ए.डी कांबळे,सुनिल कांबळे,चंदगड तालुक्यातील नवोदित पत्रकार,कवी आणि लेखक रजनी कांबळे,ज्योतिका कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या क्षणी वसतीगृहाचे अधिक्षक विलास कांबळे,सखाराम कांबळे(कोळिंद्रे खा.) व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. 
दिवसभरातील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.ए.डी.कांबळे यांनी केले. सुनिल कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments