वैभववाडी तालुका आणि नगरपंचायतीवर एकहाती सत्ता असल्यामुळे वैभववाडी शहर हा आमदार नितेश राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र वैभववाडी नगरपंचायतीमधील ७ राणे समर्थक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेना नेते अतुल रावराणेंनी राणेंच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, अमित शाहांचे पाय जिथे जिथे लागतात, तिथे तिथे भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलतं, हा देशातला इतिहास आहे असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला.
आरक्षण पडल्यानंतर आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, याची चलबिचल झाल्याने भाजपच्या सात नगरसेवकांनी हे पाऊल उचलले आहे. वैभववाडीत भारतीय जनता पक्ष मजबूत आहे. दोन महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजप सर्व १७ जागांवर जिंकेल, असा विश्वास राजन तेली यांनी व्यक्त केला.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती आहे. त्यामध्ये तीन माजी नगराध्यक्षाचा समावेश आहे. सातही जणांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष किंवा नगरसेवकपद भूषवलं आहे.
0 Comments