धक्कादायक! मिरजेत १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार


 मिरज रेल्वे स्टेशन समोर कोल्हापूरच्या १९ वर्षीय तरुणीवर दोन आरोपींनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. या प्रकरणी दोघा  आरोपींवर बलात्कार आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या तरुणीला आरोपींनी जबरदस्ती दारु पाजून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती आहे.पीडित मागील काही दिवसापासून मिरजमध्ये मैत्रिणीसोबत राहत होती.

बलात्कार प्रकरणी सांगलीतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजू अच्युदन आणि अक्षय कणशेट्टी या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या महिन्यापासून सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. सर्वत्र पोलिसांचा खडा पहारा असताना मोकळ्या जागेत बलात्काराच्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments