आमदार संजयमामा शिंदे स्थानिक विकास निधीतून कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयास रूग्णवाहिका


कुर्डूवाडी/प्रतिनिधी:

तातडीच्या परिस्थितीत अद्ययावत अशी रुग्नवाहिका   सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असावी या उद्देशाने आमदार स्थानिक विकास निधीतून कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयास रूग्णवाहिका देण्यात आली त्याचा लोकार्पण कार्यक्रम आज पार पडला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ.रणदिवे यांचेकडे चावी सुपूर्द करून करण्यात आली.

यावेळी कुर्डूवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष समीर मुलाणी,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजयजी डिकोळे, जेष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष अर्जून बागल,जि.प.सदस्य आप्पा उबाळे,ता.पं.सदस्य सुरेश बागल,माजी उपसभापती प्रताप नलवडे,नगरसेवक आनंद टोणपे,संभाजी सातव,संजय गोरे,चंद्रकांत वाघमारे,मुलाणी सर,तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ.थोरात, कुर्डूवाडीतील ग्रामस्थ व पञकार बंधू उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments