"कोथळी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद"

प्रा.डॉ. प्रभाकर माने / शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

मातोश्री सोशल फाउंडेशन कोथळी व लायन्स क्लब जयसिंगपूर रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या  मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
           
 सामाजिक कार्यकर्ते संजय नांदणेकर यांनी सदर शिबिराचे उद्घाटन करून या शिबिरास शुभेच्छा दिल्या व संबंधित आयोजकांचे मनस्वी अभिनंदन केले.या शिबिराचे प्रास्ताविक मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन आवळे यांनी करून या शिबीर आयोजनाचा मुख्य हेतू त्यांनी स्पष्ट केला.
   
 यानंतर आदर्श विद्यालय कोथळी  रविवार दि. २८/२/ २०२१ रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी प्रसिद्ध धन्वंतरी व नेत्रचिकित्सक डॉ. देवेंद्र पवार यांनी केले. या शिबिरास परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून सदर शिबिरांमधून २७० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामधील १५ रुग्णांना मोतिबिंदू असल्याने त्यांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन पटवर्धन हॉस्पिटल सांगली टे.के आय क्लीनिक येथे बुधवार दि.३/३/२०२१ रोजी करण्यात येणार आहे. जे नेत्ररुग्ण दारिद्र्य रेषेखालील आहेत अशा रुग्णांचे ऑपरेशन मोफत होणार आहे. तसेच इतरांचे अल्पदरामध्ये ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
        
सदर कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते व गटनेते संजय नांदणेकर, कोथळी गावचे नूतन सरपंच ऋषभ पाटील,मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जिवन आवळे व लायन्स क्लब जयसिंगपूर रॉयलचे अध्यक्ष प्रकाश बन्ने ,शितल बरवाडे, बिरंजे सर मातोश्री सोशल फाउंडेशनचे सुशांत चूडाप्पा ,रमेश घाटके, किसन भोसले ,उमेश पवार, विठ्ठल गुदळे,मेहबूब मुजावर, श्रीकृष्ण नरळे व अन्य पदाधिकारी उपस्थित     
        
या शिबिराच्या आभार प्रदर्शन लायन्स क्लब जयसिंगपूर रॉयलचे अध्यक्ष प्रकाश बन्ने यांनी मानले.या शिबिरास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भविष्यात पुन्हा अशा शिबिराचे आयोजन करावे लागेल अशा प्रकारची शक्यताही निर्माण झाली असल्याची माहिती कळते. संबंधित आयोजकांनी केलेल्या उत्कृष्ट नेत्र शिबीर आयोजनाबद्दल कोथळी गावकऱ्यांनी व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments