बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या आगळगावच्या सरपंचपदी पुतळा गरड तर उपसरपंचपदी वैभव उकिरडे यांची निवड झाली आहे. वैभव उकिरडे या तरुणाने पहिल्यांदाच निवडणूक लढवली असून उपसरपंचपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. दोन्ही सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील आगळगाव येथून ग्रामीण भागातील प्रचार सभांचा श्री गणेशा होत असतो. त्यामुळे, आगळगाववर तालुक्यातील नेत्यांची विशेष मर्जी असते. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री विठ्ठल रुक्मिणी ग्रामविकास आघाडीने ९ उमेदवार निवडून आणत ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्यानंतर, शुक्रवारी सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी झाल्या. त्यामध्ये, सरपंचपदी पुतळा गरड यांना संधी मिळाली. तर, उपसरपंच म्हणून वैभव उकिरडे यांच्याकडे गावचा कारभार देण्यात आलाय.
वैभव हे आगळगावचे आजपर्यंतचे सर्वात तरुण उपसरपंच ठरले आहेत. या निवडीनंतर ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला. तसेच, नवीन सदस्य मनीषा थिटे, रेहाना मुजावर, रेणुका गायकवाड , सावित्रा डमरे, रत्नमाला विधाते, अनंत कोरे, सचिन खटके, बालाजी जाधव, सचिन किरतकुडवे यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी, धनराज गरड, अजय गरड, विकास उकिरडे, गोरख गरड, माजी सरपंच सूरज आगळे, दशरथ गरड, दिलीप डमरे, पोपट डमरे, गणेश डमरे, दत्तात्रय गिराम यांसह गावकरी उपस्थित होते.
0 Comments