मोदींच्या व्हिडीओवर डिसलाईकचा पर्याय का नसतो? - अभिनेता कमाल आर. खान


अभिनेता कमाल आर. खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमच्या व्हिडीओवर डिसलाईक करण्याचा पर्याय का नसतो? असा सवाल त्याने मोदींना केला आहे.

“आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी  तुम्ही तुमच्या व्हिडीओवर लाईक डिसलाईक करण्याचा पर्याय देत नाही. मग इव्हीम मशीनचं बटण तरी दाबण्याचा पर्याय कसा द्याल? अरे मी विसरलोच तुम्हाला तर ईव्हीएमवर पुर्ण विश्वास आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने मोदींना उपरोधिक टोला लगावला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी त्यानं मोदींच्या फॉलोअर्सची देखील खिल्ली उडवली होती. “अन्न मिळालं नाही तरी चालेल, नोकरी मिळाली नाही तरी चालेल, पाकिटात पैसे नसले तरी चालेल, देशावरील कर्ज वाढलं तरी चालेल. भुकेलेले राहू, जंगलात राहू, नग्न राहू, मग भारताला अखंड ठेवू. देशातील सर्व कंपन्या विकल्या गेल्या तरी चालतील पण देश विकू देणार नाही. मला भक्तांची इच्छाशक्ती प्रचंड आवडते.” अशा आशयाचं ट्विट त्यानं केलं होतं.

Post a Comment

0 Comments