लग्नाळू तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांच्याशी खोटे लग्न करून दागिने, पैसे घेऊन पळून जाणाऱ्या नवीच्या टोळीला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळातील ९ महिला आणि २ पुरूषांना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त कुटुंबांना लुटले असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती रवींद्र पाटील (वय ३५ ) असं अटक केलेल्या मुख्य आरोपी महिलेचे नाव आहे. या महिलेनं आपल्या साथीदारांच्या मदतीने नाशिक, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, वापी आणि कोल्हापुरातील नागरिकांना गंडा घातला आहे. एका तरुणाने तक्रार दिल्यामुळे या गँगचा खेळ खल्लास झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचे खोटे नाटक करून ही टोळी महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटक राज्यात सक्रिय झाली होती. या महिलेनं आतापर्यंत ५० पेक्षा जास्त पुरूषांना फसवून त्यांच्याशी लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर दागिने, पैसे, मौल्यवान वस्तू आणि कपडे घेऊन पसार होत होती. पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे कर्मचारी एका गुन्ह्याचा तपास करीत होते. त्यावेळी तक्रारदाराने ज्योती पाटील ही महिला एका महिन्यांपूर्वी भेटली होती. तिने लग्न लावून देण्याचे सांगत तरूणाकडून अडीच लाख रूपये घेतले. लग्नानंतर लग्न केलेल्या मुलीने तक्रारदाराच्या घरातून अडीच लाख रूपये घेऊन पळ काढला होता.
या टोळीने केलेल्या गुन्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने जवळपास पन्नास कुटुंबांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला. मात्र, सामाजिक प्रतिष्ठा भावी या कुटुंबांनी अजूनही पोलिसांकडे तक्रारी केलेला नाहीत जी माहिती आरोपींकडून मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांकडून आता पुन्हा पीडित नागरिकांचे सुधा चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, यातील अनेक जण ही तक्रार देण्यास उत्सुक नसल्याचे ही पोलीस सूत्रांकडून समजत आहे.
लग्नाळू मुलांना ह्या अशा पद्धतीने ठकवणाऱ्या महिलांची टोळी शहरभर चर्चेचा विषय झाला आहे. त्यातच लग्न करताच दोन दिवसांनी माहेरी जाऊन परत येते, असं सांगून सोनं आणि पैसे घेऊन नवरीच पळून जात असल्यामुळे तक्रार कशी करावी असा प्रश्न पीडित कुटुंबासमोर असायचा. त्यामुळेच या टोळीची भीड चेपली आणि त्यांनी अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले मात्र आता त्या कायद्याच्या बडग्यात सापडल्या.
0 Comments