प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्ह्यातील अविष्कार फौंडेशन, इंडिया या संस्थाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार जाहीर करण्यात येत असतो.यावर्षी शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या प्रा.डॉ.मनिषा विनोद काळे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२१ जाहीर करून प्रदान करण्यात आला.
प्रा.डॉ.मनिषा विनोद काळे या जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर येथे बॉटनी विषयाच्या प्राध्यापिका व विभाग प्रमुख म्हणून सेवेत कार्यरत आहेत. त्यांचा अध्यापनाचा ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या संशोधनात्मक कार्यासाठी त्या शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात त्यांचे लौकिक असून त्यांनी ७ नॅशनल अवॉर्ड प्राप्त केले आहेत. त्यांच्या या संशोधनात्मक कार्याचा भाग म्हणूनच १ मेजर व १ मायनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण करून संशोधनात्मक कार्य मजबूत केले आहे. जवळपास ४० आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सेमिनार व कार्यशाळामध्ये पेपर सादरीकरण व सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
डॉ. मनिषा काळे यांच्या संशोधनात्मक कार्यातील उल्लेखनीय कार्य म्हणजे 'बायो इथेनॉल प्रोडक्शन फ्रॉम डेअरी वेस्ट वॉटर' या विषयावर त्यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे.तसेच शैक्षणिक धुरा सांभाळताना २ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी संपादित केली आहे. संशोधनात्मक कार्याबरोबर लेखन कला अवगत असल्यामुळे त्यांचे २ औषधीय वनस्पतीवर आधारित पुस्तके प्रकाशित झाले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. डॉ.काळे यांनी 'महिला सबलीकरण व वनस्पतीशास्त्र' या विषयाच्या अनुषंगाने शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्याचबरोबर विद्यापीठ व महाविद्यालयाच्या विविध समित्या व एक महिला प्राध्यापक म्हणून त्यांनी नेत्रदीपक कार्य केले आहे.
डॉ. मनिषा काळे यांनी महाविद्यालयात स्वकर्तृत्वातून नक्षत्र गार्डनची निर्मिती करून दुर्मिळ अशा असंख्य वनस्पतींचे रोपन करून त्या त्या वनस्पतींचे संवर्धन केले आहे. त्यांच्या या कामाबद्दल 'कोल्हापूर गार्डन क्लबच्या' वतीने विशेष सन्मान पुरस्कार २०१९ त्यांना मिळाला आहे. डॉ.मनिषा मॅडम यांनी शिवाजी विद्यापीठाच्या धर्तीवर 'बोटॅनिकल गार्डन' बनविले असून त्यामध्ये जैवविविधता अभ्यास केंद्राची निर्मिती केली आहे.त्यामध्ये जवळपास २०० औषधी वनस्पतीची लागवड केली आहे. त्यांनी आपले कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता आपल्या संशोधनात्मक व विषयाची व्याप्ती वाढावी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या त्याचबरोबर आणि विद्यापीठात ही वृक्षसंवर्धन व औषधी वनस्पतीचे वर्गीकरण करण्यासाठी ते हिरीरीने सहभागी होत असतात. त्यांच्या या शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्याचे योगदान ही खूप मोलाचा आहे. त्यांनी स्वेच्छेने 'सावित्रीबाई फुले दत्तक योजनेअंतर्गत'जयसिंगपूर शहरातील २ मुली शैक्षणिक दत्तक घेतल्या आहेत. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत रोटरी क्लब जयसिंगपूर द्वारे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानी या अगोदरही सन्मानित झाल्या आहेत.
एक महिला म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटकाला अभिमान वाटावे असे डॉ.मनिषा काळे यांचे कार्य सर्वांना ज्ञात आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार आजच्या आधुनिक काळातील मनिषा रुपी सावित्रीला दिल्यासारखा आहे. त्यांनी पुरस्कार स्वीकारताना आपल्या मनोगतात म्हणाले की, मला मिळालेला पुरस्कार हा अखंड स्त्री जातीचा मान सन्मान आहे अशी भावोउद्गार त्याप्रसंगी काढले. त्यांना मिळालेला या पुरस्काराची चर्चा व आनंद सर्वत्र होत आहे.
0 Comments