मुंबई/प्रतिनिधी :
कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याचा कुटुंब सर्वेक्षणावर आधारित “मुंबईत कोविड-१९ चा परिणाम – उपजिविका, आरोग्य, शिक्षण, घरे आणि परिवहन यांबाबत नागरिकांचे सर्वेक्षण हा प्रजा फाऊंडेशनने तयार केला आहे.
प्रजा फाउंडेशनचा हा अहवाल गुरुवार, दिनांक २८जानेवारी रोजी प्रकाशित झाला. महामारी व लॉकडाऊनमुळे शहराच्या सामाजिक-राजकीय व आर्थिक परिस्थितीवर बराच प्रभाव पडल्याचे जाणवल्याने या प्रभावाचे नेमकेपणाने विश्लेषण करण्यासाठी कुटुंब सर्वेक्षण करण्यात आले. उपजिविका, आरोग्य, शिक्षण, घरे आणि परिवहन या महत्त्वाच्या घटकांबात प्रजाने हंसा रिसर्चच्या सहाय्याने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष या अहवालात सादर केले आहेत’, असे प्रजाचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले.
‘सर्वच क्षेत्रातील उपजिविका आणि रोजगाराला फटका बसलेला आहे. टाळेबंदीमुळे नोकरीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे प्रत्येक तीन व्यक्तीपैकी दोघांनी सांगितले आहे. नोकरीवर प्रतिकूल प्रभाव पडला असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या ही ३६ टक्के आहे तर २८ टक्के लोकांचा पगार कमी केला गेला.
0 Comments