बार्शी!तीन शेतकऱ्यांचा सहा एकर ऊस जळाला


बार्शी/प्रतिनिधी:

विजेच्या तारा तुटून ठिणगी उडून बार्शी तालुक्यात बावी येथील सहा एकर ऊस जळाला. या घटनेत तीन लाखांचे नुकसान झाले आहे. संभाजी पोपट पाटील, बाबासाहेब पाटील व पोपट अंबादास पाटील या तीन शेतकऱ्यांचा ऊस जळाला असून सोमवारी दुपारी ही घटना घडली.

याबाबत मंगळवारी वीज वितरण अधिकारी व तहसील कार्यालयाच्या सूचनेनंतर तलाठ्यांनी धाव घेऊन नुकसानीचा पंचनामा केला. याबाबत शेतकरी संभाजी पाटील यांनी उशिरा तालुका पोलिसांत माहिती दिली.

या शेतकऱ्यांच्या उसाच्या फडातूनच महावितरणच्या तारा गेल्या आहेत. काढणीला आलेल्या ऊसात दुपारी डीपीवरील विजेच्या तारा तुटल्याचा मोठा आवाज होऊन ठिणग्या उडाल्या. इतक्यात ऊसाने पेट घेतला. बघता-बघता आग भडकत गेली.

या शेतकऱ्यांनी आरडाओरड करताच स्वतः संभाजी पाटील, दयानंद आगलावे, मोहन आगलावे, हरिकांत आगलावे या गावकऱ्यांसह ५० जण आग आटोक्यात आणण्यास धावून आले. पुढील अनर्थ टाळण्यासाठी बाजूचा ऊस तातडीने तोडून बाजूला टाकला.


 

 

Post a Comment

0 Comments