माढा! बारलोणी येथे पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या


माढा/प्रतिनिधी:

बारलोणी ता. माढा येथे संशयित गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या सोलापुर गुन्हे अन्वेषण विभाग ग्रामीण पथकावर जमावाने हल्ला केला होता. त्या हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेले राहुल सर्जेराव गुंजाळ, यशवंत दशरथ गुंजाळ, अनिल दशरथ गुंजाळ या फरार आरोपींना कुर्डूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमानाजी केंद्रे यांना गुप्तहेर कडून कव्हे -बारलोणी रोडवर एका ठिकाणी तिघेजण लपून बसले, असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्याा आधारे पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कव्हे -बारलोणी रोडवर कुर्डूवाडी पोलीस पथकाने छापा टाकत फरार तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या पथकामध्ये दत्ता सोमवार, प्रविण दराडे, सागर सुरवसे यांनी आरोपींना अटक केली आहे. त्या तिघांना माढा न्यायालयाने चार दिवस १३ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

(Advertise)

काय आहे प्रकरण -

बारलोणी येथील काही मंडळी सोने आणि चांदी गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांच्या होते. बारलोणी (ता. माढा) येथे संशयित गुन्हेगाराला पकडण्यासाठी  पथक गेले होते. सांगोला येथील घडलेल्या गुन्ह्यातील हा संशयित आहे. पोलिसांनी शंकरला पकडल्यानंतर काही महिला व काही गावकऱ्यांनी पोलीसांच्या गाडीवर तूफान दगडफेक करत आरोपीला सोडवले. यामध्ये पोलीस पथकातील तीन कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले होते तर पोलीस वाहनांचे दगडफेकीमुळे नुकसान झाले आहे.

Post a Comment

0 Comments