सरपंच होण खरचं मानसन्मान,प्रपंचाची वाताहत, सेवाभाव,वितंडवाद...


गावचा सरपंच होणं ही खरंच मान -सन्मानाची गोष्टं आहे का ? खरंच त्याचा  फायदा होतो का? भावी सरपंच,युवा नेते म्हणून मिरवणाऱ्यासाठी झण-झणीत अंजन घालणार सडे तोड आपल्या अनुभवातील लेख लिहिला आहे. सचिन सूर्यवंशी सर यांनी.

ही वास्तववादी कहानी आहे, परंडा तालुक्यातील देऊळगाव येथील माजी सरपंच श्रीराम ञिबंक सुर्यवंशी यांची.

माझा जन्म १९७९ चा, नातलग जवळपास पाटील घराण्यातील असल्याने अर्थातच सर्व बाबी मानसन्मानाच्या हव्या, गावकारभार हे गुण आलेच. वडील एकटे ,तीन चुलते सर्व एकञ कुटूंबाला १०० एकरापेक्षा जास्त जमीन होती.मी लहानाचा मोठा होईपर्यत कुटूंब वेगळ राहिल तरी आम्हाला वेगळ असल्यासारख कधी जाणवल नाही. माञ शेती वेगळी झाली,घर वेगळ प्रत्येकाचा प्रपंच वेगळा सुरु झाला.

वाडा बांधलेला तुराट्या कुड, मातीच्या भेंड्यांनी भिंती वेगळ्या झाल्या. वडिल कधी शेतीत राबायचे,सालकरी ठेवायचे इतर आपआपली शेती स्वत:करु लागले. 

मी लहान असल्यापासुन आजपर्यत बटईने शेती करुन घेतो.कधी स्वत:ची बैले तर कधी वाटेकऱ्याची आहेत.

१९८२ दरम्यान वडिल गावचे सरपंच झाले त्यावेळी ३६ एकर क्षेत्र वाटुन आले होते. त्यावेळी गावात लाईट आली जोड व्यवसाय म्हणून पिठाची गिरणी टाकली त्यासाठी नऊ एकर क्षेञ १५०० रु एकरने विकले व हिस्सेदार एक त्यांची सहा एकर विकली.

गावकारभार परंडा जाणे-येणे रोजगार हमी, पाझर तलाव कामे, आमदार नेते यांची उठबस. गिरीणी चालवण्यास गडी असायचा .सरपंच झाले तेव्हा  धाबा नव्हता घरीच आमरस जेवण, कायम पाच-दहा वर्ष चहा-पानी तेही वैरण चिपाडे /स्टो इंधनावर व्हायच. 

गावात पहिल्यांदा घरी लाईट असणार,थोडफार शिक्षित कुटूंब पण पांढरपेशी जीवन दोन अपत्य असताना १९९६ दरम्यान प्रपंच , भुकंपात मिळालेली खोली निट बांधण्यासाठी तीन एकर जमीन १२ हजार रुपये एकरने , गिरणी १९९८ ला ३६ हजारला विकली त्यातील लाईट बील ९ हजार थकलेले गेले राहिलेले जोडिदार हिस्सा 13हजार गेला, आमचा हिस्सा १३ हजारआला.मुलीच्या लग्नाला २००० साली तीन एकर ३५ हजार एकरने शेतजमीन विकली गेली. 

सरपंच काळात फार तर पाझर तलाव हजेरी,आमदार, तहसीलदार ओळख,कोर्टकचेरी हे ऐकण्यात आम्ही लहानाचे मोठे झालो.इतर शेती करणारे काही वेगळ नाही. घरातील किराणा माल घ्यायलाही व्याजाने पैसे काढावे लागायचे तरीपण गावातील मोठ जमिनदार कुटूंब म्हणुन ओळख.

निवडणुकीत याचे काम केले, त्याने बंडाळी केली, याच खाल्ल त्याच खाल्ल हे ऐकण्यात आम्ही वाढलो. हाच वारसा पुन्हा पुतण्यान चालवला अनुभव वेगळा नाही. त्यांची कहाणी हीच. 

गावगाड्याचा, पांढरपेशी राहण्याचा नाद नसणारांनी शेतजमीनी घेतल्या. विकाताना घेणाराला फसवले, विकणारे चलाख आहेत हे ऐकवण होतच. आपल्या तालुक्यातील बऱ्याच सरपंचाची कहाणी यापेक्षा वेगळी नसेल. 

आज केवळ शेती केली असती तर १५  एकर क्षेत्र गेल नसत. १५ एकर१२ लक्ष एकराने आजच्या बाजारभावाने एक कोटी ऐशी लक्ष होतात.रेशन दुकान माल घरी आणुन दिला,तलाठ्याने सातबारा मोफत दिला,नोंदी मोफत केल्या, ग्रामसेवक ऐकतो ,शिपाई काम करुन देतो हे मोठेपण चांगल की एक कोटी ऐशी लक्ष मोठे.

बंगला, चारचाकी बडेजाव हौस पुर्ण करण्यासाठी काही नेत्यांनी हेच केले.आज बंगला, चारचाकी किंमत शुन्य आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्या प्रमाणे स्वत: सक्षम झाल्याशिवाय या राजकारणाच्या खेळात पडु नका. समुह एकञ येऊनच सामाजिक काम करा.एकट या खेळात पडु नका .

खरोखरच यातून आजच्या भावी नेते म्हणून मिरवणाऱ्या युवकास वर्गासाठी प्रेरणा मिळेल व योग्य निर्णय घेऊन आपला उद्योग- व्यवसायाची भर भराट करता येईल. आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करता येईल.

Post a Comment

0 Comments