पंतप्रधानांवरील टिप्पणी पायलटला पडली महागात ..



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी केल्याचं एका पायलटला चांगलंच महागात पडलं आहे. या पायलटला विमान कंपनीनं बडतर्फ केलं आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या पायलटनं यापूर्वी हवाई दलामध्येही काम केले होते.

गो एअर विमान कंपनीचे पायलट मिक्की मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विट्सची कंपनीनी तातडीनं दखल घेत शनिवारी त्यांना नोकरीवरुन बडतर्फ केलं आहे. ‘गो एअर एअरलाईन्स या प्रकराच्या कोणत्याही गोष्टी कधीही खपवून घेणार नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नोकरीचे नियम, तसंच नीतीदर्शक तत्वांचं पालन करणे अनिवार्य आहे. सोशल मीडियावरील  वर्तनाचाही यामध्ये समावेश आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा एअरलाईन्सशी कोणताही संबंध नाही’ असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

या प्रकरणानं वेगळं वळण घेतल्यानंतर कॅप्टन मलिक यांनी माफी मागितली आहे. “माझ्या ट्विट्सचा कंपनीशी कोणताही संबंध नव्हता. ते संपूर्णपणे माझे वैयक्तिक विचार होते. मी या कृतीची जबाबदारी घेतो. त्याचबरोबर या प्रकरणामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांची माफी मागतो’’ असं मलिक यांनी स्ष्ट केलं आहे.

Post a Comment

0 Comments