करमाळा तालुक्यातील नागरिकांनो, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या 'या' सूचना लक्षात घ्या व मतदाना दिवशी वर्तन करा, अन्यथा होऊ शकतो गुन्हा दाखल


करमाळा/प्रतिनिधी:

 उद्या दिनांक १५ जानेवारी २०१९ रोजी करमाळा पोलीस ठाणे हद्दीत एकूण १४९ ग्रामपंचायतीचे ५६ गावांमध्ये मतदान होत आहे. त्यास अनुसरून नागरिकांनी व मतदारांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. पालन न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी.

▪️मतदान केंद्राचे बाहेर १०० मीटरवर पांढरी रेषा असेल त्याच्या आत मतदार किंवा इतर नागरिकांनी कोणतेही वाहन आणू नये, वाहन पार्क करुन नये किंवा तेथे विनाकारण थांबू नये.

▪️१०० मीटरच्या आत जे दुकान, हॉटेल, टपरी किंवा इतर अस्थापना असतील त्या मतदानाचे वेळी सकाळी ०७.३० ते सायंकाळी मतपेट्या रवाना होई पर्यंत बंद ठेवाव्यात. पांढऱ्या रेषेच्या आत ज्या लोकांची घरे येतात तेथे फक्त घरातील लोकांनीच थांबावे. बाहेरील लोकांना घरांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. जर त्यांनी बाहेरील लोकांना प्रवेश दिला तर घर मालकावर किंवा कुटुंबीयांवर कारवाई करण्यात येईल.

▪️BLO हे १००मीटरच्या बाहेर थांबतील. तेथे गर्दी होईल असा कोणताही प्रकार करणार नाहीत.

▪️पॅनल कार्यकर्ते, पक्षाचे लोक हे २०० मीटरच्या बाहेर एक टेबल व दोन खुर्ची ठेवून मतदारांना बुथची माहिती देऊ शकतात. पण त्या ठिकाणी मंडप टाकणार नाहीत. २ पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी थांबणार नाहीत तसेच चिन्हाच्या चिठ्ठ्या देणार नाहीत.

▪️ माननीय जिल्हाधिकारी, सोलापूर यांचा जमावबंदीचा आदेश लागू असल्याने गावात व इतर ठिकाणी लोक जमावाने थांबणार नाहीत. मतदान करून लगेच आपापले घरी जातील.

 ▪️मतदानाचे वेळी मतदान केंद्रात कोणीही मोबाईल घेऊन जाणार नाहीत. मतदान करते वेळेस चॅटिंग करणार नाहीत. मोबाईलवर मतदान करते वेळी व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करणार नाहीत. तसे केले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. अटक केली जाईल. यापूर्वी एका व्यक्तीने स्वतःचे मतदान करतानाचा व्हिडीओ क्लिप काढून प्रसारित केली होती, त्याच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र पाठविण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला सजा देऊन जेलमध्ये पाठवले आहे.

▪️ज्या इसमांना १४४ (३) चा आदेश दिलेला आहे व हद्दपार केले आहे त्यांनी मतदानाच्या दिवशी म्हणजे दिनांक १५/०१/२०२१ रोजी त्यांच्या गावाच्या हद्दीत फक्त मतदान करण्यासाठी यायचे आहे, मतदान झाल्यानंतर थांबायचे नाही. त्यांनी परत गावाच्या हद्दीच्या बाहेर जायचे आहे. जर बेकायदा थांबलेला दिसला तर गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल.

▪️ बंदोबस्तात असलेले पोलीस किंवा मतदान प्रक्रियेत असणारे अधिकारी व कर्मचारी हे आपली वाहने मतदान केंद्र किंवा शाळेच्या कंपाऊंडच्या आत लावणार नाहीत.  त्यांनी वाहने १०० मिटरच्या बाहेर पार्क करायची आहेत.

▪️ उमेदवार किंवा त्यांच्या वतीने कोणी मतदारांवर दबाव टाकत असेल किंवा प्रलोभने दाखवत असेल व अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई केली जाईल.

 ▪️सर्व मतदान केंद्रावर पोलीसांकडून कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. जर त्या ठिकाणी एखाद्या नागरिक किंवा मतदार वारंवार येत असेल तर त्याची शूटिंग व फोटोग्राफी घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मतदारांनी एखाद्या मतदान केंद्रावर वारंवार ये-जा करू नये.

▪️ग्रामपंचायत निवडणूक संदर्भाने एखादा गुन्हा दाखल झाल्यास पुढील पंधरा वर्षे पोलीस स्टेशनला त्यासंबंधाने रेकॉर्ड जतन करून ठेवले जाते व प्रत्येक निवडणुकीमध्ये संबंधित आरोपींवर कारवाई केली जाते, याची माहिती सर्वांना असावी.

▪️वरील सूचनांचा व नियमांचा भंग केला किंवा दंगा, मस्ती, गोंधळ, आगाऊपणा केला तर गुन्हे दाखल करून अटक करून रिमांड घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.

 


Post a Comment

0 Comments