गृहमंत्र्यांनी पत्नीसाठी विकत घेतली कारागृहात कैद्यांनी तयार केलेली पैठणीगृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पत्नीसाठी सुंदर पैठणी खरेदी केली आहे. सौ. आरती यांच्यासाठी अनिल देशमुख यांनी ही पैठणी खरेदी केली आहे. देशमुख यांनी शुक्रवारी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. या ठिकाणी कैद्यांच्या श्रमातून बनणाऱ्या अनेक वस्तूंचं विक्री केंद्र आहे.

याच केंद्रातून गृहमंत्र्यांनी तुरुंगातील कैद्यांनी विणलेली पैठणी आपल्या पत्नीसाठी खरेदी केली. पैठणी घेतल्यानंतर देशमुख यांनी आग्रहाने किंमतही दिली आहे.

तुरुंगात येणारा प्रत्येकजण जन्मजात किंवा सराईत गुन्हेगार असतोच असं नाही. संतापाच्या भरात किंवा परिस्थितीमुळे काहींच्या हातून गुन्हा घडून जातो. त्यानंतर न्यायदेवतेने सुनावलेली शिक्षा ते भोगत असतात.आपल्याच समाजातल्या वाट चुकलेल्या लोकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे आवाहनही देशमुख यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments