पुन्हा बिबट्याचा हल्ला; चिकलठाण ऊस कामगारांच्या मुलींवर प्राणघातक हल्लाचिखलठाण/प्रतिनिधी:

 करमाळा तालुक्यातील काल चिकलठाण येथे एका ऊस तोड कामगाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तिचा जीव गेला नंतर वनविभागच्या कारवाईनंतर बिबट्या तिथून दुसरीकडे पसार झाला. असे वाटत होते. पण आज मंगळवारी पुन्हा त्याच परिसरात बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

 मिळालेली माहिती नुसार आज मंगळवारी दुपारी २.३० वा. सुमारास चिकलठाण येथील कोटलिंग मंदिराजवळ ऊसतोड चालू असताना एका ऊस तोड मजूरावर बिबट्याने हल्ला केला. पण इतर मजूर व लोक असल्यामुळे संबंधित मजुराचे प्राण वाचले. बिबट्याने केलेला हल्ला फक्त हातावरच निभावला. एकूण प्रकारे बिबट्या अजून ही त्याच शेत परिसरात आहे. हे दिसून आले, आता वन विभाग पुढे काय करतो, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.


Post a Comment

0 Comments