जिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे


बार्शी/प्रतिनिधी:

जिल्हा परिषद शाळेत शिकविणाऱ्या अनेक शिक्षकांची मुले खासगी शाळेत शिकत आहेत. जिल्हा परिषद शाळेची स्तिथी आणि दर्जा दोन्हीही सुधारत आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर आहे, असं सोलापुरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

(Advertise)

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी घरी जाऊन त्यांचा सहकुटुंब सत्कार केला. यावेळी बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेतील मुलांची सेवा म्हणजे शिक्षकांनी त्यांच्या आईची सेवा केल्यासारखे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अभिमान असेल तर त्यांनी सुरुवातीला त्यांची मुले जिल्हा परिषद शाळेत घालावीत, जेणेकरून जिल्हा परिषदेच्या शाळांविषयी आत्मीयता निर्माण होईल, अशा शेलक्या शब्दात दत्तात्रय भरणे यांनी शिक्षकांचे कान टोचले.
(Advertise)

जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून डिसले गुरुजींचा गौरव होणे ही नक्कीच अभिमानास्पद आहे. सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणारा आपला शिक्षक जागतिक पातळीवर सन्मानित होतो यापेक्षा अभिमानाची दुसरी गोष्ट नाही, असं सांगत गुरुजींच्या पुढील वाटचालीस भरणे यांनी शुभेच्छा दिल्या.

दत्तात्रय भरणेंकडून डिसले गुरुजींचा सहकुटुंब सत्कार
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी घरी जाऊन त्यांचा सहकुटुंब सत्कार केला. यावेळी आमदार राजाभाऊ राऊत उपस्थित होते.
डिसले गुरुजींना मिळालेला पुरस्कार राज्यासाठी अभिमानास्पद आहे.

सोलापूर येथील रणजितसिंह डिसले यांना मिळालेला पुरस्कार हा राज्याला अभिमानास्पद गोष्ट आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डिसले गुरुजींनी सुचविलेल्या नवनवीन उपक्रमापाठीमागे शासन खंबीरपणे उभा राहील. त्यांनी राबविलेलं उपक्रम राज्यात राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार तसंच डीपीडीसीच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देऊ, असंही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. त्याचबरोबर लवकरच मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते डिसले गुरुजींचा सत्कार करणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

डिसले गुरुजी ‘ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टिचर प्राईझ जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजारहून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डीसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments