पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची सतेज पाटील ठरविणार दिशा



नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा मोठ्या फरकाने विजय झाला. काँग्रेस कडून शिक्षक मतदारसंघासाठी प्रा. जयंत आसगावकर यांच्या नावाचा आग्रह सतेज पाटील यांनी धरला होता. याबद्दल श्रेष्टींकडे तशी मागणीही केली होती. सोबतच राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांना पदवीधरची उमेदवारी मिळाली. या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी सतेज पाटील व हसन मुश्रीफ या दोघांनीही अथक प्रयत्न केले. मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये सतेज पाटील सरस ठरले. स्वतःचा पराभव पचविल्यानंतर पुन्हा निवडून येऊन इतर आमदारांना निवडून आणण्याची किमया साधणाऱ्या सतेज पाटील यांची किंगमेकर म्हणून  ओळख अधिक ठळक झाली आहे.

(Advertise)

 राज्याचे गृहराज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशी दोन्ही ताकदीची पदे असणाऱ्या सतेज पाटील यांनी आपली पूर्ण ताकद या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या दोन्ही आमदारांना निवडून आणण्यासाठी लावली होती. 
 
(Advertise)

तस पाहायला गेलं तर पुणे पदवीधर मतदारसंघात पुण्यानंतर कोल्हापूर जिल्हा सर्वात महत्वाची भूमिका बजावत असतो. यंदा देखील तीच परंपरा शाबूत होती.त्या दृष्टीने सतेज पाटील यांनी जिल्ह्याची एकहाती धुरा सांभाळली. प्रा आसगावकर आणि अरुण लाड यांच्या विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. या सर्वांचा परिपाक म्हणजे या दोन्ही जागा महाविकासआघाडीने मोठ्या फरकाने जिंकल्या. 

 (Advertise)

सतेज पाटील यांनी पक्ष श्रेष्टींना दिलेला शब्द नेटाने पेलला आणि पाळला. यातूनच त्यांचं पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात महत्व तर वाढलच आहे पण राज्याच्या भविष्यातील काँग्रेस प्रणित राजकारणाची सुद्धा सतेज पाटील दिशा ठरवतील.

Post a Comment

0 Comments