महाआवास अभियानाच्या पुर्ततेसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा ; मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या सूचना


सोलापूर/प्रतिनिधी:

 महाआवास अभियान योजनेतून घरकुल बांधणीसाठी प्रत्येक विभागांनी आपले योगदान द्यावे. त्यासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिल्या.
         (Advertise)  

 महाआवास अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वामी यांनी आज आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेत झालेल्या या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी राहुल देसाई, उत्तर सोलापूरच्या गटविकास अधिकारी जस्मिन शेख, सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अभियंता प्रदीप कुलकर्णी, सहाय्यक पुरवठा अधिकारी विवेक साळुंके उपस्थित होते.
     
(Advertise)

 स्वामी यांनी सांगितले की, महाआवास अभियानातून जिल्ह्यात ३२२०२ घरकुले पूर्ण करायची आहेत. याचवेळी घरकुलाचे काम सुरु असताना लाभार्थीस मनरेगाचा लाभ देणे, नळ जोडणी देणे, शौचालयाचा लाभ आणि वीज जोडणी द्यायची आहे. त्यासाठी संबंधित विभागाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियोजन करावे.
           
 जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घरकुलासाठी उपलब्ध झालेल्या शासकीय जमिनीची मोजणी करुन हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधून जमीन मोजणीचे शुल्क आदा करावे, जेणेकरुन शासकीय जमिनीची मोजणी करुन हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल, यावेळी सामाजिक न्याय विभाग, कामगार विभाग आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून महाआवास अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी  होण्यासाठी मदत घेण्याच्या सूचना स्वामी यांनी दिल्या.

Post a Comment

0 Comments