चिखलठाण मधील आठ वर्षाच्या मुलीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला


 करमाळा-प्रतिनिधी
              
 गेल्या काही दिवसांपासुन करमाळा तालुक्यात बिबट्याने दहशत माजवली आहे. दि. ३ व ५ डिसेंबरला बिबट्याने एक पुरूष व एक महिला अशा दोन व्यक्तिंवर हल्ला करुन त्यांचा बळी घेतला आहे. या सर्व घटनांवर लक्ष देत, वनविभागाने बिबट्याला शक्यतो पकडणे. व जर परिस्थितीनुसार बिबट्याला पकडणे शक्य नसल्यास ठार मारणे. हे आदेश वनविभागाने दिले असले तरी, बिबट्याची दहशत आणि त्याने मनुष्यावर हल्ले आणखी तरी सुरुच ठेवले आहेत. 
(Advertise)

 आज दिनांक ०७/१२/ २०२० रोजी चिखलठाण केडगाव शेटफळ सीमेवरती राजेंद्र बारकुंड यांच्या शेतामध्ये सकाळी साडे अकराच्या दरम्यान ऊस तोडी टोळी मधील आठ वर्षाची मुलगी बिबट्याने पकडली होती. बिबट्याच्या तावडीतुन त्या मुलीची सुटका ही केली होती. परंतु मुलीची तब्येत चिंताजनक होती. व उपचारा दरम्यान मुलीचा मृत्यू झालेला आहे. बिबट्याने मनुष्यावर हल्ला करण्याची ही तिसरी घटना असुन, या सर्व घटनांवरुन असे लक्षात येते कि, बिबट्या मनुष्यावर हल्ले एक दिवसाआड करत आहे. तरी लोकांनी सावधानता बाळगावी. व सतर्क राहण्याचे शासनाच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments