रणजितसिंह डिसले गुरुजीवर पोस्टाचे तिकीट जारी


बार्शी/प्रतिनिधी:  

सोलापूर विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर  सूर्यकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली डाक विभागाच्या माय स्टॅम्प योजने अंतर्गत, सात कोटी रुपयांचे ग्लोबल पुरस्कार विजेते रणजित  डिसले गुरुजी वर शनिवारी ५, डिसेंबर २०२० रोजी पोस्टाचे तिकीट जारी करण्यात आले.  
      
(Advertise)

या तिकिटाचे वितरण नुकतेच सोलापूर विभागाचे स. अधीक्षक मुख्यालय गोविंद दातार आणि बार्शी उपविभागाचे उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांचे हस्ते ग्लोबल पुरस्कार विजेते रणजीत डिसले गुरुजी यांना करण्यात आले.
     
(Advertise)

यावेळी उदयकुमार पोतदार व सोलापूर येथील पोस्टल सायकल क्लबचे अनंत होंडरे, अमर कुलकर्णी, उल्हास सुतार, महेश तोष्णीवाल, पंजाबराव कराड, राजाभाऊ मोरे, प्रकाश काकडे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments