ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना सर्वर डाऊन व कनेक्टिव्हिटी येत नसल्याने मागील दोन दिवसापासून इच्छुक उमेदवार केंद्रप्रमुख यांची झोप उडाली होती. महाईसेवा केंद्रांच्या समोर रात्रभर जागे राहूनही ऑनलाइन अर्ज भरताना येत नव्हते.
त्यातच बुधवार ३० डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने निर्धारित वेळत अर्ज दाखल करता येणार की नाही अशी शंका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु सर्वच उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता यावेत म्हणून निवडणूक आयोगाने आदेश काढत पारंपरिक पद्धतीने अर्ज स्विकारण्याचे सांगितले असून ३० डिसेंबर रोजी अर्ज स्वीकृती साठी वेळ वाढवून देण्यात आला आहे.
यावेळी २८ डिसेंबर रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इ.तक्रारी निवडणुक आयोगाकडे गेल्या होत्या
0 Comments