तिसऱ्या वनडे सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी मात


ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्या तिसऱ्या वनडे  मॅचमध्ये भारताने अखेर विजय मिळवला आहे. रंगतदार ठरलेल्या या सामन्यात भारताने बाजी मारली १३ धावांने ऑस्ट्रेलियावर मात केलीये. भारताने प्रथम फलंदाजी करत ३०३ धावांच आव्हान ऑस्ट्रेलियाला दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची सुरुवात फारशी चांगली नाही झाली.

कर्णधार आरोन फिंचने डाव सावरत ७५ धावांच्या खेळीने टीमला १०० च्या पार नेलं. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने तुफान फलंदाजी करत टीमला जिंकण्याच्या उंबरठ्यावर आणलं होतं. मात्र बुमराहच्या बॉलवर त्याचा त्रिफळा उडाला. त्यानंतर मात्र टीम इंडियाचं पार जड झालं आणि भारताने अखेर विजय मिळवला.

भारताकडून मराठमोठ्या शार्दूल ठाकूरने ३ सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर बुमराह आणि नजराजने २-२ विकेट्स घेतल्या. तर जडेजा आणि कुलदीप यादवने १-१ विकेट पटकावली.

Post a Comment

0 Comments