"तैमूरच्या नावावर झालेल्या वादानंतर" दुसऱ्या बाळाच्या नावाबद्दल करीना म्हणते


बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ती आपल्या दुसर्‍या बाळाला जन्म देईल. करीना कपूरचे चाहते या गोड बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि तिच्या बाळाचं नाव जाणून घेण्याचीही त्यांना इच्छा आहे. 

यापूर्वी जेव्हा करिना आणि सैफने पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं होतं तेव्हा त्या नावाचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. अनेक महिने या नावाचा वादंग सुरू होता. आता तिने आपल्या दुसर्‍या मुलाच्या नावासाठी केलेल्या योजनेबद्दल सांगितलं आहे. 

एका चॅट शोमध्ये करिना म्हणाली की तैमूरच्या नावावर झालेल्या वादानंतर मी आणि सैफने दुसऱ्या बाळाच्या नावाचा विचार करणं सोडून दिलं आहे. नाव ठेवण्याची गोष्ट आम्ही शेवटच्या वेळेला ठेवली आहे असे करीना म्हणाली.

Post a Comment

0 Comments