प्रत्येक कोल्हापूरकर एक ब्रँड - भूषण गगराणी

" ज्या ज्या व्यक्तिमागे कोल्हापूरकर अस नाव लागत तो एक प्रकारचा ब्रँड बनून जातो. कोल्हापूरच्या मातीत घडलेला प्रत्येकजण स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करतो आणि कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार नेतो", असे उद्गार राज्याचे नगररचना विभागाचे प्रधान सचिव श्री भूषण गगराणी यांनी काढले. ब्रँड कोल्हापूर या गौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापूरचे नाव अटकेपार पोहचविणाऱ्या आणि कोल्हापूरच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कोल्हापूरकरांचा गौरव करण्याची संकल्पना राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री श्री सतेज पाटील यांनी मांडली आणि ती अंमलात देखील आणली. गेल्यावर्षी काही अपरिहार्य कारणांमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. पण यावर्षी हा कार्यक्रम अधिक उत्साहाने घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आणि तो पूर्ण देखील केला.
आज कोल्हापूरचे सुपुत्र आणि राज्याच्या नगररचना विभागाचे प्रधान सचिव श्री भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत हा कौतुक सोहळा सयाजी हॉटेल येथे पार पडला. तब्बल ९० हुन अधिक कोल्हापूरकरांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला. सांस्कृतिक, विज्ञान, संशोधन, क्रीडा, कला, शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या आबालवृद्धांचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला. 
यावेळी कोल्हापूर दक्षिणचे आमदार श्री ऋतुराज पाटील यांनी आभार व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी कोल्हापुरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments