लॉजवर नेऊन बलात्कार केल्याचा पी.एस.आय. वर आरोप ; तरुणीनं नोंदवला एफ.आय.आर.



एम.आर.ए. मार्ग पोलिसांनी  मुंबई पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. आरोपी पी.एस.आय.ने तक्रारदार तरुणीबरोबर सोशल मीडियावरुन मैत्री केली होती.

 या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. आमचा तपास सुरु आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
 
आरोपीबरोबर फेसबुकवरुन माझी मैत्री झाली होती असे तक्रारदार तरुणीने पोलिसांना सांगितले. आरोपीने लग्नाचे आश्वासन दिले होते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आरोपी तरुणीला दक्षिण मुंबईतील लॉजवर घेऊन गेला,  तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने माराहण सुद्धा केली आणि नंतर लग्नाला नकार दिला. तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून तपसाकर्ते आरोपीचं फेसबुक अकाऊंट तपासत आहेत.

Post a Comment

0 Comments