शरद पवार यांची यूपीएच्या अध्यक्षपदाची निवडीची शक्यता?


 दोन दिवसांनी शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यावेळी यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं समजतंय.

(Advertise)

शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागणार असल्याचं कळतंय. पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवण्याऐवजी शरद पवार यांच्यासारखा अनुभवी चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे.

Post a Comment

0 Comments