मागील निवडणुकीचा खर्च सादर न केलेल्या चार हजार जणांना निवडणूक लढवण्यास बंदी


पंढरपूर/प्रतिनिधी:

ग्रामपंचायत निवडणूक लढवून भावी ग्रामपंचायतचे कारभारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चार हजार जणांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील २०१५ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणुकीचा खर्च सादर केल्यामुळे निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील तीन हजार ७९३ जणांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे. यादी निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आली. यामुळे भावी कारभारी होण्याच्या सदस्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे.

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निवडणूक आयोगाला यादी सुपूर्त 

२०१५ साली तत्कालीन जिल्हा अधिकारी रणजीत कुमार यांनी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना प्रशासनाकडे खर्च सादर करण्याचे अनिवार्य होते. मात्र उमेदवारांनी प्रशासनाच्या या निर्णयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार ७९३ नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे. या बाबत ३० जानेवारी २०१७ रोजी तत्कालीन जिल्हा अधिकारी रणजीत कुमार यांनी निवडणुकीचा खर्च सादर न केलेल्यांची यादी निवडणूक आयोगाला पाठवली होती. यामध्ये तालुकानिहाय निवडणूक लढण्यास अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने ही यादी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दिली आहे.

श्री हालमत सांप्रदाय मंडळाची २०२१ ची दिनदर्शिका माफक दरात उपलब्ध.....
किंमत फक्त ३० रुपये
संपर्क : ७३८७७१२५२५/९७३००३२७२४

(Advertise)

उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार चिंतेत

 यंदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या वेळी या यादीत नाव आहे की नाही, याची खात्री करुनच अर्जाला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. यामुळे उमेदवार  चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.त्यामुळे संभाव्य उमेदवारांना इच्छा असतानाही निवडणूक लढविता येणार नाही.अर्ज दाखल केला तरी तो बादच होणार असल्याने अनेक उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला निवडणूकच लढवता येणार नसल्याने विरोधी उमेदवारांकडून आंदोत्सव होत आहे.

मंगळवेढा तालुक्यात १४४ उमेदवारांना बंदी

मंगळवेढा तालुक्यात २०१५ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च निवडणूक आयोगास सादर न केल्यामुळे तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीमधील १४४ उमेदवारांना निवडणूक लढविण्यावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. मंगळवेढा तालुक्यात सन २०१५ साली ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या निवडणूक खर्चाचा हिशोब निवडणूक कार्यालयात वेळेत सादर करणे उमेदवारास आवश्यक होते.

Post a Comment

0 Comments