“पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही”


 पवार साहेबांनी या नाथाभाऊंना आमदार करायचं ठरवलं तर मला इतरांच्या मतांची गरज पडणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

कालपर्यंत अनेक लोक एकनाथ खडसे संपले असे म्हणत होते. मात्र, आता नाथाभाऊंनी एकच प्रकरण बाहेर काढले तर महाराष्ट्र हादरला, असं खडसे म्हणाले.
(Advertise)

हे तर पहिलेच प्रकरण आहे, अजून कितीतरी प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात मोठी राजकीय गँग अडकली आहे. मात्र, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही जण नाही. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

दरम्यान, भाईचंद हिरांचद रायसोनी सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळ्यांवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Post a Comment

0 Comments