सुरेश रैना, सुझान खानची उपस्थिती असणाऱ्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा

 
मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याचं वृत्त समोर येत आहे. या कारवाईमध्ये सदर ठिकाणी क्रिकेटपटू सुरेश रैना, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, गायक गुरु रंधावा उपस्थित असल्याचं म्हटलं जात आहे.  तर रॅपर बादशाहने यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती उघड होत आहे.

प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत क्लब सुरु ठेवल्यामुळं कारवाई करण्यात आली आहे. या क्लबच्या ग्राहकांमध्ये अनेक सेलिब्रिटी असल्याची माहिती समोर आली असून, यामध्ये ३४ ग्राहकांसह ७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(Advertise)

मुंबई एअरपोर्टजवळ असणाऱ्या ड्रॅगन फ्लाय क्लब येथे मुंबई पोलिसांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही धाड टाकली. ज्यानंतर क्लबमध्ये असणाऱ्यांची नावं समोर आल्यामुळं एकच खळबळ माजली आहे.

 कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं हॉटेल सुरु करण्याला सशर्त परवानगी दिली खरी. पण, नियमांची पायमल्ली करत काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरु ठेवले जात आहेत, तिथं कोरोनासाठीच्या निर्बंधांचं योग्य पालनही केलं जात नसल्यामुळं ही धाड टाकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments