अकलूज/प्रतिनिधी:
तलवार, कुराङ व लाकङी दांङके हातात घेऊन फोटो काढणे व हे फोटो सोशल मिङीयावर टाकणे काही तरुणांना भलतेच महागात पङले आहे. अशा ७ तरुणांना पकङुन अकलूज पोलीसांनी न्यायालयात उभे केले.
याबाबत अकलूज पोलीसांकङुन मिळालेली माहीती अशी की, पिसेवाङी, ता. माळशिरस येथिल दीपक शिवाजी भाकरे, शहाजी जनार्धन इंगळे, शैलेश शहाजी भाकरे, महेश नवनाथ भाकरे, सागर अच्युतराव चव्हाण, सतिश सदाशिव इंगळे व समाधान निवृत्ती भाकरे या सात जणांनी हातामध्ये तलवार, कुराङ व लाकङी दांङके घेऊन फोटो काढले व ते सोशल मिङीयावर अपलोङ केले. हे फोटो सोशल मिङीयावर आल्याने जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोठेतरी टोळीयुध्द होणार कि, हे तरुण काहीतरी मोठी गङबङ करणार अशी आशंका निर्माण झाली.
__________________________________________
श्री हालमत सांप्रदाय मंडळाची २०२१ ची दिनदर्शिका माफक दरात उपलब्ध.....
किंमत फक्त ३० रुपये
संपर्क : ७३८७७१२५२५/९७३००३२७२४
_________________________________________
या तरुणांनी पुढील हालचाल करण्यापुर्वीच कर्ताव्यदक्ष अकलूज पोलीसांनी ताबङतोप यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या सर्व तरुणांवर आर्म अॕक्ट कलम ४/२५ व मुंबई पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना माळशिरस न्यायालयात हजर करण्यात आले.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ताञय पुजारी, पोलीस अंमलदार बाळासाहेब पानसरे, संतोष घोगरे, सुहास क्षीरसागर, रामचंद्र चौधरी, विश्वास शिनगारे, मंगेश पवार, नितीन लोखंङे, निलेश काशिद, विक्रम घाङगे व मनोज शिंदे यांनी केली आहे. या गुन्हेगारांनी शस्ञे कोठुन आणली, निवङणुक काळात कोण शस्ञ पुरवठा करत आहे, यांचा हेतु काय होता याचा पुढील तपास पोहेकाॕ. क्षीरसागर हे करत आहेत
अकलूज पोलीस स्टेशन सीआर नंबर ५४८/ २०२० भा द वि १४३ १८८ आर्म एक्ट ०४.२५ मुंबई पोलीस कायदा १३५ गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments