"साई संस्थानने तो निर्णय मागे घ्यावा अन्यथा मला तिथे यावे लागेल" - तृप्ती देसाई


शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख घालावा लागणार आहे. संस्थानच्या या निर्णयानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी संस्थानवर जोरदार टीका केली आहे. एखाद्या भक्तांच्या कपड्यावरून त्या व्यक्तीला तुम्ही ती व्यक्ती कशी आहे हे ठरवू शकत नाही. शिर्डी संस्थाने घेतलेल्या निर्णय म्हणजे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान आहे.

(Advertise)

कोरोना महामारीमुळे तब्बल आठ महिन्यानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर हे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख घालावा लागणार आहे. 

(Advertise)

दरम्यान, या निर्णयाचा निषेध करत देसाई पुढे म्हणाल्या की, शिर्डी येथील मंदिरातील अनेक पुजारी हे अर्ध नग्न अवस्थेत असतात. त्यामुळे कुठल्याही भक्ताने असे म्हटले नाही की पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश देऊ नका. त्यामुळे शिर्डी संस्थांने घेतलेला निर्णय हा पूर्णपणे भक्तांचा अपमान करणार आहे. त्यामुळे शिर्डी संस्थांने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा. आणि शिर्डी मध्ये जो बोर्ड लावला आहे तो त्वरित काढून टाकावा अन्यथा शिर्डी मध्ये येऊन आम्ही तो बोर्ड स्वतः काढू, असे देसाई म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments