माळावर लागली आग अन् सुर्डीकर धावले पार !



 जुनेद शेख / सुर्डी प्रतिनिधि : 

सुर्डी गावच्या शिवारात माळावर अचानक काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली.वाळलेल्या गवताने अधिक पेट घेतल्याने आगीचे लोट निर्माण झाले.या आगीची बातमी गावातील व्हॉट्स ग्रुप वर समजताच तीस - पस्तीस तरुणांनी माळाकडे धाव घेतली.अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळी पोहचत या तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले.तब्बल अर्धा तास या वणव्याशी झुंजल्यानंतर तरुणांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
(Advertise)

आग विझवल्यामुळे तेथील निसर्गाची हानी टळली गेली.तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे गावात त्यांचे कौतुक होत आहे.आग कशामुळे लागली हे मात्र अजुन स्पष्ट झाले नाही.

(Advertise)

सुर्डी गाव गतवर्षी पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत प्रथम आले आहे तेव्हा पासून गावचे नागरिक निसर्ग,पर्यावरण,वृक्षारोपण या संबंधी अधिक जागृत झाले आहेत.सप्टेंबर महिन्यात पडलेल्या अतीपावसात सुर्डी गावच्या शिवारातील पाझर तलाव फुटण्या पासुन वाचवुन हेच गावचे तरुण कौतुकास पात्र ठरले होते.
गावात झालेली जनजागृती आणि निसर्गा बद्दल आलेले आत्मभान हेच या कार्याचे प्रेरणा स्थान असल्याचे यातून दिसुन येत आहे.

Post a Comment

0 Comments