"जनतेने भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली" - रोहित पवार


 राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. 

(Advertise)

महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा सूफडासाफ झाला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात देखील महाविकास आघाडीला जबरदस्त यश मिळाले.

(Advertise)

रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये म्हटलं आहे की, “भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली आहे”.

Post a Comment

0 Comments