कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांच्या समर्थनात उद्या सोलापूर जिल्हा बंद


बार्शी/प्रतिनिधी:

कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावतीने आठ डिसेंबर रोजी सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे व हे आंदोलन शांततेच्या मार्गाने असणार आहे.
(Advertise)

केंद्र सरकारने आणलेले कृषि विषयक कायदे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत हे कायदे रद्द करण्याची मागणी पंजाब व हरियाणामधील शेतकऱ्यांनी केली आहे. हे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरु केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी  भारत बंदचे आवाहन करण्यात आले त्या राज्यातील विविध पक्षांकडून बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
(Advertise)

'इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे' या म्हणीप्रमाणे शेतकऱ्यांसाठी मंगळवारी एक दिवस सोलापूर जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद ठेवून या बंद मा सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा प्रमुख विजय रणदिवे यांनी केले आहे
(Advertise)

उद्याच्या बंदला मंगळवेढा, पंढरपूर, बार्शी, मोहोळ, करमाळा, माळशिरस, अकलूज, कुर्डूवाडी येथील व्यापारी महासंघानी पाठिंबा जाहीर केला आहे. उद्याचा बंद हा वेगळ्या प्रकारचा बंद आहे.यात राजकीय पक्षांचा सहभाग असला तरी हा राजकीय बंद नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या वा संघटनेच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हा बंद नाही. बंद शेतकऱ्यांसाठी केला जाणार आहे.

  गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर थंडी, वारे व सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता जे शेतकरी बांधव बसले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा बंद आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. त्यामुळं हा जनतेनं स्वेच्छेनं बंदमध्ये सहभागी व्हावं व बळीराजाच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन अनेक सामाजिक संघटना व विविध पक्षांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments