विठुरायाच्या चरणी पाऊण कोटींचे दानपंढरपूर/प्रतिनिधी:

पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यसरकारने राज्यातील प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली केली होती आठ महिने राज्यातील मंदिर बंद असल्यामुळे मंदिरामध्ये देणग्यांमध्ये मोठी घट झाली होती १६ नोव्हेंबर पासून पंढरपूर येथील विठुरायाचे मुखदर्शन सुरू झाल्यापासून विठ्ठल मंदिर समितीच्या देणगी मध्ये वाढ होऊ लागली आहे. विठुरायाच्या चरणी भाविकांनी ७४ लाखाचे दान अर्पण केले असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.


विठ्ठलाच्या दरबारी भाविकांची गर्दी

विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. १६ नोव्हेंबरपासून विठुरायाचे मुखदर्शन सुरू झाल्याने देणगीमध्येही वाढ होऊ लागली आहे. लॉकडाउननंतर श्री विठ्ठलाचे द्वार मुखदर्शनासाठी खुले झाल्यानंतर आता पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे आता उत्पन्नात देखील समाधानकारक वाढ होऊ लागली आहे.
पंढरपूर रोज हजारो भाविक दाखल होत आहेत विठुरायाचे मुख दर्शनाचा लाभ ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविकांना मिळताना दिसत आहे मात्र ज्या भाविकांना मुख दर्शन घेता येत नाही ते भाविक विठ्ठल मंदिराच्या कळसाचे किंवा नामदेव पायरीचे दर्शन घेऊन माघारी परतत आहे विठ्ठल मंदिर समितीकडून मुखदर्शन घेणाऱ्यांची संख्या ४८०० करण्यात आली आहे. दोन महिन्यापासून ७० हजार भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मातेेेचे दर्शन घेतले 

नववर्षात निमित्ताने पंढरपूर गर्दी होण्याची शक्यता
नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना पंढरपूर मध्ये येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहे विठ्ठल मंदिर समितीकडून करुणा महामारी  पार्श्वभूमीवर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.ऑनलाइन आणि दानपेटीतील देणगी मिळून आजअखेर ७४ लाख रुपयांचे दान जमा झाले आहे. यंदा कोरोनामुळे देणगी कमी असली तरी दहा महिन्यांनंतर त्यामध्ये वाढ झाली आहे. नववर्षाच्या निमित्ताने सुद्धा भाविकांची गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने जास्तीत जास्त भाविकांनी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यावे, असे आवाहन श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments