पंढरपुर मधील कौठाळीत ढाणे कुटुंबियांनी केले मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत


पंढरपूर/प्रतिनिधी:

जग एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना  आजही समाजामध्ये  मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो मुलगी जन्माला आली तर तिला नकोशी करत तिची हत्या केल्याच्या अथवा फेकल्याच्या दुदैवी घटना आपण एकल्या असतीलचं. मात्र अशा घटनेस कौठाळी तालुका पंढरपूर येथील ढाणे पाटील कुटुंब अपवाद ठरले आहे. या कुटुंबीयांनी मुलगी झाल्याचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. हलग्यांच्या कडकडाटात  फटाक्यांच्या अतिषबाजी करीत मुलीचे फुलांच्या पायघड्यावरून घरापर्यत स्वागत करण्यात आले. 

(Advertise)

संपूर्ण कौठाळी पंचक्रोशी चा परिसर परीसर याला साक्षी होता. कौठाळी येथील शेतकरी पांडुरंग ढाणे पाटील यांचे चिरंजिव संग्राम व सीमा यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. घरातील पहिलेच कन्यारत्न असल्यामुळे ढाणे पाटील यांनी त्यांच्या घरी आलेल्या कन्येचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. यावेळी ढाणे पाटील कुटुंबीयांनी बाळ व आईसाठी राहत्या घरापासुन शंभर फुटापर्यंत फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. त्याचबरोबर आकर्षक अशी  रांगोळी काढलेली, दारात गालीचा अंथरलेला. सगळीकडे रंगित फुगे लावलेले होते.
  
(Advertise)

स्वागत समारंभासाठी उपस्थित सर्व महिलांना झाडांचे वाटप करण्यात आले गाडीतुन बाळ व तीची आई उतरताच त्यांना फुलांच्या पायघड्या वरून वाजत गाजत औक्षण करून स्वागत करण्यात आले. व्हीडीओ शुटींग व फोटोग्राफरची लगबग उडाली. बाळ दारात येताच सुहासिनींनी बाळाला व आईला ओवाळले. भिजवलेल्या कुंकात नवजात मुलीची पदचिन्हे उमटवण्यात आली. उपस्थित सर्व आप्त व मिञांना पंचपक्वान्नांचे भोजन देण्यात आले. गावामध्ये प्रथमच असा  मुलीच्या जन्माचा अनोखा सोहळा पार पडल्यामुळे  ढाणे पाटील कुटुंबीयांनी मुलगा-मुलगी असा भेदभाव  होऊ नये यासाठी  आदर्श निर्माण केला आहे त्या नवजात मुलीचे स्वागत अशा पध्दतीने झाल्यामुळे कौठाळी गावासह परिसरात कौतुक होत आहे.

(Advertise)

दरम्यान एकीकडे जन्मजात मुलीवर नकोशी वागणूक मिळत असताना, दुसरीकडे ढाणे पाटील कुटुंबीयांनी अशाप्रकारे मुलीच्या जन्माचे स्वागत केल्याने, समाजासमोर त्यांनी आदर्श ठेवला आहे. तसेच मुलींना नकोशी वागणूक देणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे.

Post a Comment

0 Comments