सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्याच्या अतिवृष्टीमुळे नुकसान २४८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; बार्शी तालुक्यात ४०.८ कोटी


बार्शी/प्रतिनिधी:

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना २४८ कोटी ८४ लाख रुपयांचे वाटप झाल्याची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली. प्रत्यक्षात काही तालुक्यात मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. शिवाय पुरामुळे घर पडलेले व जनावरे मृत्युमुखी झालेल्या नुकसानग्रस्त नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

(Advertise)

 अतिवृष्टीचा फटका सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, सांगोला, दक्षिण- उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी या तालुक्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. ऑक्टोंबर महिन्यात सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभे पिकामध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोलापूर जिल्हा कृषी विभागाकडून अकरा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. त्यात अतिवृष्टी मध्ये दोन लाख ६६ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता.प्रशासनाकडून मात्र ९९ टक्के मदतीचे वाटप झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

(Advertise)

सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी

 उत्तर सोलापूर तालुक्यात ९ हजार ३४३ शेतकऱ्यांना १०.०४ कोटी, बार्शी तालुक्यातील ३० हजार ९६३ शेतकऱ्यांना ४०.०८ कोटी, दक्षिण सोलापूर तालुक्यात ९९२३ शेतकऱ्यांना १२.०८ कोटी, अक्कलकोट तालुक्यात १४ हजार ६८५ शेतकऱ्यांना २२.७४ कोटी, माढा तालुक्यात ३१ हजार २०६ शेतकऱ्यांना २७.४८ कोटी, करमाळा १४ हजार २२८ शेतकऱ्यांना ९.८० कोटी, पंढरपूर तालुक्यात ३४ हजार १७६ शेतकऱ्यांना ४८.५० कोटी, मोहोळ तालुक्यात १२ हजार ९६९ शेतकऱ्यांना १७.२९ कोटी, मंगळवेढा तालुक्यात ४१ हजार २१ शेतकऱ्यांना २०.२५ कोटी, सांगोला तालुक्यात ४५ हजार ७१६ शेतकऱ्यांना २८.६२ कोटी तर माळशिरस तालुक्यात २२ हजार ५६६ शेतकऱ्यांना ११.९० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

1 Comments