वाढदिवसाच्या बहाण्याने तरूणीला बिअर पाजली ; नंतर डोंगरावर नेऊन केला बलात्कार


 मित्राच्या वाढदिवसाला जायचे असल्याचे सांगून भोसरीतील एका तरूणीला रिक्षातून पुण्यात शिवाजीनगरमधील एका बारमध्ये नेण्यात आले. तिथे तिला बिअर पाजण्यात आली. त्यामुळे तिला गुंगी आली. त्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला दिघी येथील डोंगरावर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी आकाश कापुरे ने पीडित तरूणीसोबत जवळीक वाढवून तिचा विश्वास संपादन केला. तसेच मित्र विशाल पाटील याच्या वाढदिवसाला जायचे आहे, असे सांगून पीडितेला रिक्षात बसविले. 

त्यानंतर तिला घेऊन पुण्यातील शिवाजीनगर येथील प्रतीक बारमध्ये गेला. तिथे पीडितेला बिअर पाजली. त्यामुळे तिला गुंगी आली. त्यानंतर घरी सोडण्याच्या बाहाण्याने पीडितेला दिघी येथील डोंगावर नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. भोसरी पोलिस तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments