कृषी कायद्यात काही बदल होतील मात्र तो कायदा बदलणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं. पाटलांच्या या वक्तव्यावर राज्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे.
कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत की कृषीमंत्री?, असा सवाल करत हसन मुश्रीफ यांनी पाटलांवर निशाणा साधला आहे. हा बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहनही हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
दरम्यान, हिंमत असेल तर बांधावर जा, शेतकरी पायातलं काढून तुम्हाला सांगेल, असं म्हणत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टीका केली. यासोबतच त्यांनी भारत बंदसाठी सर्वांनी आपल्या घरासमोर काळा झेंडा लावा. माझा काय संबंध असं न म्हणता प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे, असं पाटील म्हणाले
0 Comments