"नृसिंहवाडीत जयसिंगपूर कॉलेज 'राष्ट्रीय सेवा योजना' व 'लोकवार्ता डिजिटल न्युज पोर्टलच्या' वतीने व्यापाऱ्यांची थर्मल तपासणी व प्रबोधन"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना व लोकवार्ता डिजिटल न्युज पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध असणारे श्री.क्षेत्र दत्त मंदिर ,नृसिंहवाडी येथे व्यापारी घटकांची थर्मल तपासणी व प्रबोधन करण्यात आले.
        
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ७ महिन्यापासून बंद असणारे श्री.क्षेत्र गुरुदत्त,नृसिंहवाडी हे धार्मिक पर्यटन स्थळ शासनाच्या नियमाच्या अधिन राहून सुरू झाले. परंतु कोरोना महामारीची प्रचंड भीती  ही व्यापारी वर्गाबरोबर धार्मिक पर्यटकांच्या मनात आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाकडून त्याचबरोबर पर्यटकांकडून मिळणारा प्रतिसाद अल्पसा आहे. तरी  मनात भीती ठेवून काही व्यापाऱ्यांनी दुकाने खुली केली व काही धार्मिक पर्यटकांनी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीस भेट दिली.परंतु कोरोना महामारीची दुसरी लाट येणार आहे अशा प्रकारची चर्चा वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. 
त्यामुळे पुन्हा त्यांच्या मनात प्रचंड भितीदायक वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर भीती कमी करण्यासाठी असंख्य व्यापाऱ्यांची थर्मल तपासणी,ऑक्सीजन लेवल तपासणी केली.तसेच व्यापाऱ्यांना व आलेल्या धार्मिक पर्यटकांना मास्क वापरण्यास व हात सॅनिटाईज करण्यास सांगून प्रबोधनात्मक कार्य केले. यासाठी नृसिंहवाडी ग्रामपंचायत कडून ही सहकार्य लाभले. या केलेल्या कामाचा श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.
      
यामध्ये कार्यक्रम अधिकारी, प्रा.डॉ.प्रभाकर माने, प्रा.मनोहर कोरे,मेहबूब मुजावर, जीवन आवळे,सौरभ आडसुळे, आदित्य कोळी,किसन भोसले,गणेश कुरले व विठ्ठल गुदळे हे एन.एस.एस. स्वयंसेवक सहभागी होते.

Post a Comment

0 Comments